अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेलफेअर संघटना

Loading

"अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेलफेअर संघटना" ही भारतातील सर्व क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी आणि हक्कांना चालना देण्यासाठी समर्पित असलेली राष्ट्रव्यापी संघटना आहे.

आमचे उद्दिष्ट

  • रोजगार हमी कामगारांच्या समस्या सोडविणे
  • रोजगार हमी कामगारांना १०० दिवस व त्यापलीकडे काम मिळविण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करणे.
  • प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर रोजगार हमी कामगारांना काम मिळणे व काम मिळावे यासाठी प्रयत्न करणे.
  • रोजगार हमी कामगारांना प्रतिदिन मजुरीचे दर वाढत्या महागाईनुसार मिळण्यास शासनास पाठपुरावा करणे.
  • रोजगार हमी कामगारांना रोजगार उपलब्ध न झाल्यास दैनिक मजुरीच्या शंभर टक्के बेरोजगार भत्ता मिळण्याकरता शासन स्तरावर प्रयत्न करणे.
  • रोजगार हमी कामगारांना प्राथमिक उपचाराची सोय मिळण्याकरता प्रयत्न करणे.
  • रोजगार हमी कामगारांना काम केल्यावर आठवडाभरात मजुरी वाटप होण्यासाठी शासनास पाठपुरावा करणे.
  • रोजगार हमी कामगारांच्या मुला मुलींना शैक्षणिक व आरोग्याच्या सोयी निर्माण करणे.
  • रोजगार हमी कामगारांच्या लहान मुलांसाठी कामाचे स्थळी पाळणाघर सुरू करणे.
  • प्रत्येक रोजगार हमी कामगारांना काम मिळालेच पाहिजे यासाठी प्रयत्न करणे.

आमचे उद्दिष्ट

  • प्रत्येक रोजगार हमी कामगारांना रोजगार हमी कामगार असोसिएशनचे सभासदत्व देणे.
  • रोजगार हमी योजना ग्रामीण विभागाप्रमाणे शहरी विभागात सुरू करण्यास शासनास पाठपुरावा करणे.
  • कुशल रोजगार हमी कामगारांच्या त्यांच्या पात्रतेनुसार काम मिळवण्याकरिता प्रयत्न करणे.
  • कुशल रोजगार कामगारांना वर्षभर काम मिळेल अशा प्रकारचे प्रयत्न करणे.
  • रोजगार हमी कामगारांचा मृत्यू व अपंगत्व आल्यास अनुदान विमा मिळण्यात शासन स्तरावर पाठपुरावा करणे.
  • केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास प्रयत्न करणे.
  • रोजगार हमी कामाच्या ठिकाणी पाणपोईची सुविधा करण्यास शासनास पाठपुरावा करणे.
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत स्त्री किंवा पुरुष यांच्या भेदभाव न करता सर्वांना सारखे मजुरीचे दर मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
  • केंद्र सरकार व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना शासनाच्या पूर्वपरवानगीने राबविणे .
  • अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेल्फेअर संघटने द्वारे मजुरांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे.